सिंगापूरात मानवी मूत्र आणि विष्ठे पासून ” न्यूब्रू ” नावाची बनणार बियर
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बियर हे सर्वाधिक लोकप्रिय पेय आहे. बियर बनवण्यासाठी पाण्याचा जास्त वापर केला जातो. सिंगापूर मध्ये पाण्याची मोठी समस्या आहे.यामुळे सिंगापूरमध्ये पाण्याच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी एका कंपनीनं चक्क सांडपाण्यापासून बियर बनवली आहे. ही बियर मलमुत्रापासून बनवण्यात येत आहे. सिंगापूरमधील एका ब्रुअरीने न्यूब्रू नावाची बिअर बाजारात आणली आहे. ही बियर मानवी मूत्र आणि विष्ठा असणाऱ्या सांडपाण्यापासून बनवली जात आहे.
न्यूब्रू बियर बनवण्याचं कारण काय?
न्यूब्रू बियर 95 टक्के सांडपाण्यापासून बनवण्यात आली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय मानकांचं पालन करत सांडपाण्यावर प्रक्रिया करून सांडपाणी शुद्ध केलं जातं. त्यानंतर या पाण्याचा वापर न्यूब्रू बियर बनवण्यासाठी केला जातो. यामागचं मुख्य कारण म्हणजे सिंगापूरमधील पाणी समस्यांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे.
न्यूब्रू सिंगापूरची ‘ग्रीनेस्ट बिअर’
द स्ट्रेट टाईम्सच्या मते, सिंगापूर इंटरनॅशनल वॉटर वीकमधील वॉटर कॉन्फरन्सच्या संयोगाने राष्ट्रीय जल संस्था पीयूबी (PUB) आणि स्थानिक क्राफ्ट बिअर ब्रुअरी ‘Brewworks’ द्वारे 8 एप्रिल रोजी Newbrew लाँच करण्यात आलं. SIWW चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रायन युएन यांच्या मते, पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्वापर करण्यासाठीची जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने न्यूब्रू बियर बनवण्यात आली आहे. ही सिंगापूरची ‘ग्रीनेस्ट बिअर’ आहे.
आधीही बनवली गेलीय अशी बिअर
सिंगापूरच्या पाणी टंचाईबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी देशाच्या जलसंस्थेनं पाण्याच्या संकटाचा सामना करण्याचा मार्ग शोधला आहे. अशा प्रकारे सांडपाण्यापासून बिअर बनवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधी या क्राफ्ट बिअर कंपनी ‘स्टोन ब्रूइंग’ ने 2017 मध्ये ‘स्टोन फुल सर्कल पेले एले’ लाँच केलं होतं. ‘क्रस्ट ग्रुप’ आणि ‘सुपर लोको ग्रुप’ सारख्या इतर ब्रुअरीजने देखील स्वच्छ सांडपाणी पुनर्वापर केलेल्या पाण्याचा वापर करून क्राफ्ट बिअर बाजारात आणली.