भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

काँग्रेसला खिंडार ! माजी खासदाराचा सदस्यत्वाचा राजीनामा, कोणत्या पक्षात करणार प्रवेश

मुंबई,मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाला खिंडार पडल्यानंतर आता काँग्रेस पक्षाला खिंडार पडायला सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले असून त्यांनी स्वतः सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची माहिती दिलेली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्यानंतर मिलिंद देवर नाराज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता त्यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे, असे बोलले जात आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून दिलेली आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मुंबईमध्ये मोठा फटका बसला आहे.

लोकसभांच्या जागावरून महाविकास आघाडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद-विवाद सुरू असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु मिलिंद देवरा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीमधील धुसफूस समोर आलेली आहे मिलिंद देवरा हे आज ता. १४ जानेवारी रोजी पक्षाचा राजीनामा देत असले तरी मिलिंद देवरा हे आज सिद्धिविनायकाचे सपत्नीक दर्शन घेणार असून त्यानंतर माध्यमांसमोर ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नंतर ते १० माजी नगरसेवक आणि २५ पदाधिकाऱ्यांसह शिंदे गटात आजच दुपारी २ वाजता वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे बिगुल अद्यापही वाजलेले नाही. परंतु येत्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून मतदार संघ बांधणीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. तर काही पक्षांकडून आपले लोकसभेचे अधिकृत उमेदवार देखील ठरलेले आहेत. परंतु महाविकास आघाडीमध्ये अद्यापही जागा वाटपाबाबत अंतिम चर्चा झालेली नाही. ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार? याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. त्यातही ठाकरे गटाकडून आधीच पाच जागांवर दावा करण्यात आलेला आहे. तर काँग्रेसकडूनही काही जागांवर दावा करण्यात येत आहे. परंतु मागील लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने केवळ एकाच लोकसभेच्या जागेवरती विजय मिळवल्याने ठाकरे गटाकडून याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहे. ज्यामुळे आता मविआमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद हात चव्हाट्यावर आलेला असल्याने दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे खासदार आहेत. ज्यामुळे ठाकरे गटाकडून या लोकसभा मतदारसंघावर आधीपासूनच दावा सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांनी पक्षाकडून कोणत्याही हालचाली करण्यात येत नसल्याकारणाने नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे त्यांनी आजच आपल्या पदाचा राजीनामा देत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते असलेले मिलिंद देवरा हे भाजपाच्या आणि शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून देण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!