भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आणखी झालं स्वस्त,किती पैशांनी कमी झाले दर,बघा आजचा भाव

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळतेय. रविवारी सकाळी 7 वाजता WTI क्रूड वाढून 81.04 डॉलर प्रति बॅरलवर विक्री होतंय. तर ब्रेंट क्रूड 85.34 डॉलर प्रति बॅरलवर ट्रेड करतंय. देशात तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे ताजे रेट जारी केले आहेत. भारतात रोज सकाळी 6 वाजता इंधनाच्या किमतींमध्ये सुधारणा केली जाते. जून 2017 पूर्वी किमतींमध्ये बदल हा दर 15 दिवसांनंतर केला जात होता.

महाराष्ट्रात पेट्रोल 66 पैसे आणि डीझेल 64 पैशांनी स्वस्त झालंय. पंजाबमध्ये पेट्रोल 30 आणि डिझेल 34 पैशांनी स्वस्त झालंय. बिहार मध्य प्रदेश, जम्मू-काश्मी आणि हिमाचल प्रदेशातही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. दुसरीकडे झारखंड आणि पश्चिम बंगालसह काही राज्यांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये तेजी पाहायला मिळतेय.

रविवारी मुंबईत पेट्रोल 104.21 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.15 रुपये प्रति लिटर आहे. पुण्यात पेट्रोल 103.76 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या 90.29 रुपये प्रति लिटर विकलं जातंय.

नाशिकात पेट्रोल 104.78 रुपये प्रति लिटर तर डिझेल 91.29 रुपये प्रतिलिटरने विक्री होतंय. नागपुरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनुक्रमे 104.06 रुपये आणि 90.62 रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत. छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल 105.66 रुपये आणि डिझेल 92.14 रुपये प्रति लिटरने मिळतंय. अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या 104.53 रुपये प्रति लिटर आहेत. तर डिझेलच्या किंमती 91.06 रुपये प्रति लिटर अशा आहेत.

अमरावतीमध्ये पेट्रोलचे दर 105.10 रुपये प्रति लिटर सुरु आहेत. तर डिझेलचे रेट 91.63 रुपये प्रति लिटर एवढे आहेत. अकोल्यात पेट्रोल 104.05 रुपये आणि डिझेल 90.62 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.सोलापूरात पेट्रोलच्या किंमती 104.79 रुपये तर डिझेलच्या किंमती 91.32 रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. कोल्हापुरात पेट्रोल डिझेलच्या किंमती या अनुक्रमे 104.84 रुपये आणि 91.37 रुपये प्रति लिटर अशा आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!