या वर्षी वेळे आधीच मान्सून दाखल होण्याचे हवामान खात्याचे संकेत
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो. पण यंदा . १३ ते १९ मे दरम्यान मान्सूनला सुरुवात होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये २० ते २६ मेपर्यंत पाऊस दाखल होईल. तर तळकोकणात २७ मे ते २ जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुखे कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत मान्सूनच्या आगमनाबाबत माहिती दिली आहे.
तसेच हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पाऊस सुरु होण्याची तारीख हवामान विभागाकडून १५ रोजी जाहीर करण्यात येईल. अंदमानानमध्ये पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होणार आहे. त्यानंतर अरबी समुद्रावर दुसऱ्या आठवड्यात पाऊस सुरू होईल आणि त्यानंतर भारतात पुढील आठवड्यात मान्सून दाखल होईल, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.
तर महाराष्ट्रात गुरूवारी मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारीही ही राज्यात अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यताही हवामान खात्या कडून वर्तवण्यात आली आहे.