मनसेचा मोर्चा आता गुजरात कडे, औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केलं मग अहमदाबादचं नाव…
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील भाजप व शिवसेना सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये २५ वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. महाराष्ट्रात औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर असं बदललं. मग गुजरातमधल्या अहमदाबादचं नाव अजूनही का आहे? यासंदर्भात गुजरातमधील नागरीक मनसे प्रमुख राज ठाकरे यांना साद घालत आहे. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली.
गुजरातमधील लोक एका तलावावर मुस्लिमांनी अतिक्रमण केल्याचा आरोप करत स्थानिक भाजप सरकारऐवजी राज ठाकरे यांना साद घालत आहेत. कारण राज ठाकरे यांनी माहीम येथील समुद्रातील अतिक्रमणाचा विषय काढला आणि ते तोडण्यात आले. राज ठाकरे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन चालत आहेत. यामुळे गुजरातमधूनही त्यांना साद घातली गेली आहे. तिथल्या लोकांच्या त्यांच्याकडे अपेक्षा आहेत, असे राजू पाटील यांनी सांगितले.