राजकीयराष्ट्रीय

“मोदींची हमी २४ कॅरेट सोन्याइतकीच खरी”, भाजपचा जाहीरनामा, काय आहे यात?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा शनिवारी जाहीर केला. ‘युवक, महिला, शेतकरी, गरीबी’ यावर जाहीरनाम्यात भर देण्यात आला आहे.

मोदी म्हणाले, “आम्ही गुणवत्तेवर भर दिला आहे. आमच्या जाहीरनाम्यात रोजगार आणि उद्योजकतेवर भर देण्यात आला आहे. विकसीत भारतासाठीचे हे संकल्पपत्र आहे,”

काय आहे जाहीरनाम्यात
मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरु राहणार

गरीबांचे कल्याण करणाऱ्या योजनांचा विस्तार करणार

तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनविणार

पाईपमार्फत स्वस्त गॅस घरोघरी पोहचविणार

तृतीय पंथियांना आयुष्यमान योजनेत आणणार

  • गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार
  • ७० वर्षांवरील लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
  • तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ
  • मुद्रा योजनेची व्याप्ती २० लाखांपर्यंत वाढवणार
  • ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ या पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार
  • महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार
  • कोट्यवधी लोकांची वीजबिल शून्य करणार
  • पंतप्रधान आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिले जाईल
  • 5G चा विस्तार करण्यात येणार असून 6G वर काम सुरु

आमचं सरकार गरीबांसाठी समर्पित सरकार आहे, आम्ही देशाच्या विकासाचा रोडमॅप समोर ठेवला आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाचा, गावाचा विकास झाला आहे. राम मंदीरासाठी मोदींचे मोठे योगदान आहे. महिला सशक्तीकरणासाठी भाजप सरकारने काम केले, असे जे.पी नड्डा यांनी सांगितले. जाहीरनाम्याला भाजपने संकल्पपत्र म्हटले आहे. जाहीरनामा समितीचे सर्व २७ सदस्य उपस्थित होते.

युवक, महिला, शेतकरी आणि गरीब अशा चारच जाती असल्याचे असे पंतप्रधान मोदी वारंवार सांगत आहेत. हे लक्षात घेता समाजातील या चार घटकांच्या उत्थानासाठी अनेक उपाययोजनांचा समावेश जाहीरनाम्यात आहे. नरेंद्र मोदी यांनी ,२०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान देण्याचा संकल्पही त्यांनी केला आहे. भाजप आपल्या जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींचे संकल्प पूर्ण करण्यासाठी रोडमॅप सादर केला आहे, असे नड्डा म्हणाले.

“आम्ही जे बोलतो ते करुन दाखवतो. केवळ भाजपचे लोकच नव्हे, तर भारतातील जनताही यावर विश्वास ठेवत आहे. आम्ही जे बोलतो ते करतो. भाजपचे जे संकल्पपत्र अत्यंत सखोल संशोधन करून आणि सूचनांची अंमलबजावणी करून तयार करण्यात आले आहे. मोदींची हमी २४ कॅरेट सोन्याइतकीच खरी आहे,” असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!