भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

Monsoon : निवडणुकांवर पावसाचे सावट! “या” जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषद,नगरपालिका यासह सर्व रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ऐन पावसाळ्यात होणार आहेत. पण, २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने आणि १५ जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होणार असल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेतो या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहिती नुसार यंदाचा मान्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल. नंतर १० ते १५ जून पर्यंत महाराष्ट्रात येईल, राज्यात जून मध्ये ९ ते १७ दिवस तर जुलै-ऑगस्ट महिन्यात १२ ते ३० दिवस पाऊस होतो. सप्टेंबरमध्येही १६ ते २७ दिवस पाऊस होतो, अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाने दिली. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन महापूर येतो, अशी पावसाळ्यात स्थिती असते. तरीही, राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, ठाणे, नागपूर, सोलापूर, अकोला, नाशिक, अमरावती, उल्हास नगर अशा १४ महापालिका तर २५ जिल्हा परिषदा आणि दोन हजार ४४८ नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून जून ते सप्टेंबर मध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर उर्वरित नाशिक, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे आता कोणत्या जिल्ह्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेले जिल्हे
ठाणे, रायगड, रत्नागिरी, जळगाव, सिंधुदुर्ग, पालघर, पुणे, नगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, बीड, हिंगोली, धुळे, नागपूर या २१ जिल्ह्यांमध्ये मागील तीन वर्षांत सरासरीपेक्षा अधिक (१०० ते सहाशे मिलिमीटर अधिक) पाऊस झाला आहे. विशेष बाब म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या काळात प्रत्येक महिन्यात किमान १० ते ३० दिवसांपर्यंत पाऊस पडतो, असेही कृषी विभागाने सांगितले आहे.

१५ जूनपूर्वी राज्यात मान्सूनचे आगमन केरळमध्ये २७ मेपर्यंत तर महाराष्ट्रात १० ते १५ जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. दरवर्षीपेक्षा यंदा मान्सून काही दिवस लांबणीवर पडेल. पण सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही, मान्सून दाखल झाल्यानंतर त्यासंदर्भात अधिक स्पष्टता येईल– नीता शशिधरण, हवामान शास्त्रज्ञ, आयएमडी

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!