महावितरणचा राज्याच्या जनतेला विजेचा शॉक, वीज दरात मोठी वाढ
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। इंधनाच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता महावितरणकडूनही वीज दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. महावितरणने इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे. त्यामुळे महागाईने हैराण झालेल्या नागरिकांना मोठ्या आर्थिक समस्यांचा सामोरे जावे लागणार आहे.
महावितरणकडूनही वीज दरात मोठी वाढ केल्याने राज्यातील जनतेला एकप्रकारचा शॉकच लागला आहे. इंधन समायोजन आकार म्हणजे FAC यामध्ये वाढ केल्याने ग्राहकांना जादा आकाराने वीज खरेदी करावी लागणार आहे. त्यामुळे आता सर्वसामन्यांना वीजेसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.
कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यानंतर इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ करण्यात येत असते. त्याला MERC यांची परवानगी असते. जून महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत जो इंधन समायोजन आकार आहे त्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
मार्च २०२२ ते मे २०२२ पर्यंत जो इंधन समायोजन आकार होता, त्याच्यापेक्षा अधिक पटीने सध्याचा इंधन समायोजन आकार वाढवण्यात आला आहे. जानेवारी २०२२ मध्ये देखील महावितरणकडून प्रति युनिट २५ पैशांची दरवाढ करण्यात आली होती. त्यावेळी देखील महावितणने समायोजन आकाराचेच कारण दिले होते.
इंधन समायोजन आकाराची वाढ
◆ ० ते १०० युनिट आधी १० पैसे, आता ६५ पैसे
◆ १०१ ते ३०० युनिट आधी २० पैसे, आता १ रुपये ४५ पैसे
◆ ३०१ ते ५०० युनिट आधी २५ पैसे, आता २ रुपये ०५ पैसे
◆ ५०१ युनिटच्या वर आधी २५ पैसे, आता २ रुपये ३५ पैसे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा