नराधम बापाचा स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। आपल्याच पोटच्या मुलीवर नराधम बापाने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली,बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटनेने खडबड उडाली .
पोलिससूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,एका खाजगी घरी स्वयंपाकी असणाऱ्या नराधम बापाने आपल्याच 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील एक वर्षांपासून जबरदस्तीने संबंध प्रस्थापित केले.मुलगी त्याच्या सोबतच राहात असताना हा धक्कादायक प्रकार घराच्या मालकिणीला समजताच तिने मुलीला पोलिसस्टेशनला घेऊन गेली असता तक्रार केल्याने नराधम बापा विरुद्ध नेरळ पोलिसस्टेशनला पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम बाप फरार आहे,