राज्यातील सत्तासंघर्ष : आमदार अपात्रता बाबत आतांची मोठी बातमी, आमदारांचं टेन्शन वाढलं
मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील सत्तासंघर्षा बाबत मोठी बातमी समोर येत आहे. आमदार अपात्रतेच्या कारवाईनं वेग घेतला आहे. त्या मुळे आमदारांचं टेन्शन वाढलं आहे. आमदारांमध्ये धाकधूक वाढत चालली असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय घेणार या कडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे.
विधीमंडळाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवण्यात आलं आहे. या पात्राद्वारे निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या घटनेच्या प्रतीची मागणी करण्यात आली आहे. विधीमंडळ सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे गरज पडल्यास लवकरच दोन्ही गटांच्या प्रमुखांना सुनावणीसाठी बोलावण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आपलं म्हणणं आता विधीमंडळासमोर मांडावं लागणार आहे. आमदारांच्या अपात्रेवर निर्णय घेण्यापूर्वी खरी शिवसेना कोणाची याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे घेणार आहेत.