भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराष्ट्रीय

तुम्हाला महितीयं…लोकसभा उमेदवाराला प्रचारसाठी किती खर्च करता येतो? पूर्वी काय होता?आता किती?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आपण मतदार आहात,आपण मतदानही करतो, परंतु आपण कधी विचार केलाय, लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलाय.
लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला प्रचारासाठी किती खर्च करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का? स्वातंत्र्या नंतर पहिल्या लोकसभा निवडणुका ते आत्ताच्या निवडणुका याकाळात प्रचारावरील खर्च किती होता. आता किती आहे.

देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५१ मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी उमेदावाराला २५ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा देण्यात आली होती. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही मर्यादा कायम होती. १९७१ मध्ये ही मर्यादा ३५ हजार करण्यात आली. त्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत त्यात काही बदल करण्यात आला नाही. त्यानंतर आवश्यकतेनुसार यात बदल करण्यात आला.

निवडणुकीत प्रचार खर्चाची मर्यादा निश्चित करण्यासाठी एका समितीची स्थापन करण्यात आली होती. २००४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचारावरील खर्चासाठीची मर्यादा २५ लाख रुपये करण्यात आली. २००९ च्या निवडणुकीत हीच मर्यादा कायम ठेवण्यात आली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०११ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी अधिसूचना काढली. यानुसार वेगवेगळ्या राज्यांसाठी लोकसभा निवडणुकीसाठीच्या खर्चाची मर्यादा २२ लाख ते ४० लाख रुपयांपर्यंत करण्यात आली.

२०१४ च्या निवडणुकीच्या आधी खर्चाची मर्यादा वेगवेगळ्या राज्यांसाठी ५४ लाख ते ७० लाख रुपयांपर्यंत करण्यात आली. २०१९ च्या निवडणुकीत यात कोणताही बदल करण्यात आला नाही. २०२० मध्ये यासंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने निवडणूक खर्चाची मर्यादा यावर्षी ९५ लाख रुपये केली आहे. म्हणजे स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत निवडणुकीसाठी प्रचार खर्चात ३८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

निवडणुकीदरम्यान होणाऱ्या खर्चावर मर्यादा ठेवण्यात येते. सर्वसाधारणपणे धनशक्तीचा वापर करुन निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न केला जातो. मतदारांना पैशांचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे आयोगाने आखलेली प्रचार खर्चावरील मर्यादा आवश्यक असते. उमेदवारांना चहा-पाणी, बैठका, सभा, रॅली, जाहिराती, पोस्टर, वाहने अशांवर खर्च करता येतो. देशात घेतल्या जाणाऱ्या निवडणुका या निष्पक्ष व्हाव्यात यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत असते.

उमेदवाराने निवडणूक लढण्यासाठी अर्ज दाखल केल्यापासूनच त्याच्या खर्चाची नोंद ठेवली जाते. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल केल्यानंतर प्रत्येक दिवसांच्या खर्चाचा हिशोब एका डायरीमध्ये ठेवावा लागतो. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर केंद्रीय आयोगाला या खर्चाचा लेखाजोखा द्यावा लागतो. त्यामुळे उमेदवाराच्या बेहिशेबी खर्चावर काही प्रमाणात आळा बसण्यास मदत होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताना स्पष्ट केलंय की, छोट्या राज्यातील उमेदवारांना प्रचारासाठी ७५ लाख रुपयांचा खर्च करता येईल, तर मोठ्या राज्यातील लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!