भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

महायुतीचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या गटाला किती जागा मिळणार?

मुंबई,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होणार. त्यात महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युल्याबाबत अद्याप कोणत्याही नेत्यांनी अधिकृतपणे माहिती दिलेली नसली तरी मिळालेल्या माहितीनुसार जो फॉर्म्युला समोर आला आहे त्यानुसारच महायुतीच्या जागावाटपचं सूत्र असेल. अपेक्षेप्रमाणे भाजपला जास्त जागा मिळणार हे नक्की.

महाराष्ट्रातील ३२ जागांवर भाजप लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला १२ तर अजित पवार गटाला लोकसभेच्या फक्त ४ जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेच्या २६ जागा भाजपने  लढवल्या होत्या. तर शिवसेनेने २२ जागांवर निवडणूक लढवली होती. सध्या शिवसेनेच्या विद्यमान १८ खासदारांपैकी १३ खासदार एकनाथ शिंदें सोबत आहेत. अशातच शिंदे गटाला लोकसभेच्या फक्त १२ जागाच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कुणाचं तिकीट कापलं जाणार? कोणा एकाचा पत्ता कट होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे अजित पवार गटाला लोकसभेच्या ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाकडे सध्या ३ खासदार आहेत. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या वाटेला ४ जागा येणार असल्याने शिंदे गट नाराज होण्याची शक्यता असल्याने पुढे काय घडते हे समोर येईलच.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!