क्राईमनाशिक

पोलिस निरीक्षकाची पोलिस ठाण्यातच सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

नाशिक,मंडे टु मंडे न्युज नेटवर्क/ एक धक्कादायक घटना नाशिक मधून समोर आली आहे. नाशिक येथे अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक(गुन्हे) अशोक नजन पाटील यांनी अंबड पोलिस ठाण्यातच आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हर मधून स्वतः च्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

आज सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आंबड पोलीस ठाण्यात त्यांनी आपलं आयुष्य संपवलं. आत्महत्येचं कारण अजूनही अस्पष्ट आहे. याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!