मोठी बातमी; शिवसेनेला पुन्हा खिंडार? १२ ते १४ खासदार शिंदेच्या संपर्कात, उदय समंतांचा दावा
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेना खासदारांचा मोठा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याची शक्यता आहे. खासदारांचा दोन तृतीयांश गट शिंदे गटात सहभागी होऊ शकतो. शिवसेनेचे १२ ते १४ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,१२ ते १४ खासदार शिंदेच्या
संपर्कात आहेत असा दावाही त्यांनी केला. शिवसेना खासदारांचा मोठा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.असं जर झालं तर शिवसेनेला हा एक मोठा धक्का असू शकतो.