महाराष्ट्र

धक्कादायक: राज्यातीलच लोकांचा महाराष्ट्र सोडण्याचा राज्य सरकारला इशारा

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यामधील तब्बल 150 गावांना महाराष्ट्र नकोसा झाला असल्याचे एका अहवालामधून समोर आले आहे.

सीमावर्ती भागांमधील अनेक गावकऱ्यांनी राज्य सरकारला महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेली भिंगारा, गोमाल-१, गोमाल-२, चाळीसटापरी या 4 गावांतील नागरिकांनी सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून मध्य प्रदेशामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पुर्वी, सोलापुरातील काही गावांनी देखील महाराष्ट्र सोडण्याचा इशारा दिला आहे.

नकोसा झालाय “या” गावांना महाराष्ट्र
सांगली जिल्ह्यामधील जाडरबोबलाद, माडग्याळ, उटगी, सोन्याळ, अंकलगी, अंकलगी तांडा, लकडेवाडी, उमदी, निगडी बुद्रुक, सोनलगी, सुसलाद, हळ्ळी, बेळोंडगी, बालगाव, बोर्गी, बोर्गी बुद्रुक, करजगी, अक्कळवाडी, गुलगुंजनाळ, माणिनाळ, मोरबगी, कोंत्येवबोबलाद, भिवर्गी, तिकोंडी, करेवाडी, संख, खंडनाळ, कागनरी, दरीबडची, दरीबडची तांडा, रावळगुंडवाडी, मुचंडी, उमराणी, खोजानवाडी, सिंदूर, गुगवाड, बसरगी, वज्रवाड, साळमळगेवाडी, मेंढेगिरी, बिळूर, वळसंग, गुड्डापूर, कोळगिरी, आसंगी बाजार, आसंगी तुर्क, लवंगा, पांडोझरी, गिरगाव. तसेच, नांदेड जिल्ह्यामधील देगलूर तालुकामधील १३, तर धर्माबाद तालुक्यामधील १९ गावांनी देखील राज्य सरकारला इशारा दिला आहे. उमरी तालुक्यामधील २ गावांचा देखील यामध्ये समावेश आहे. यासोबतच, चंद्रपूर – महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावे. सोलापूर-अक्कलकोट तालुका – २३ गावे. दक्षिण सोलापूर तालुका – १० गावे इतक्या गावांना महाराष्ट्र नकोसा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!