भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

“गुरुजींना” घेऊन ” विद्यार्थिनी ” फरार, विद्यार्थिनी व गुरुजींच्या प्रेमाची अजब कहाणी

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। “एक दुजे के लिये ” सारखी आपण अशी अनेक चित्रपट बघतो, मुलगा मूलगीला पळवून नेतो,किंवा घरच्यांचा विरोध असेल तर दोघे सोबत पळवून जातात,परंतु ही प्रेमकहाणी वेगळीच आहे ,” साथ जिऍंगे साथ मारेंगे ” म्हणत मुलगी आपल्याला शिकवणाऱ्या गुरुजींनाच घेऊन पाळली,ही प्रेमकहाणी एका चित्रपटातली नसून प्रत्यक्षात घडलेली प्रेमकहाणी आहे. ” मी माझ्या प्रियकर शिक्षकाला घेऊन पळाले आहे. माझे आई, वडील, भाऊ या लग्नाच्या विरोधात आहेत. त्यामुळे माझ्याकडे पळून जाण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता” असं काजल कुमारीनं व्हायरल व्हिडीओ मध्ये म्हटलं आहे. व्हिडीओमध्ये ती स्वत:च्या लग्नाबद्दल बोलत आहे.

बिहारच्या बेतियाच्या नवलपूर् मधील ही घटना असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, १९ वर्षे वय असलेली तरुणी काजल कुमारी ही काही दिवसांपूर्वी घरातून पळाली. ‘माझे आणि गुरुजींचे बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मी त्यांच्याकडे कोचिंग क्लासला जायचे. तेव्हापासून आम्ही प्रेमात पडलो, घरच्या लोकांच्या विरोधा मुळे मी शिकवणीला जायचं बंद केलं. पण तरीही मी आणि गुरुजी एकमेकांच्या संपर्कात होतो. मात्र माझ्या कुटुंबीयांचा याला विरोध असल्याने त्यांनी यावरून मला मारहाणही केली,’ असं तिनं लिहिलेल्या पत्रात व सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत म्हटलं आहे….

” आता मी जगेन तर बंधू चौधरींसोबत आणि मरेन तर बंधू चौधरींसोबतच ” ‘मी माझ्या प्रियकराला म्हणजेच शिक्षक बंधू चौधरींना घेऊन पळाले आहे. माझे कुटुंबीय मला मारण्याच्या तयारीत होते. मला पळून जाण्या शिवाय दुसरा पर्यायच नव्हता , मग मी दुसरं काय केलं असतं? त्यामुळेच मी पळून यांच्याकडे आले आणि यांना पळवून नेलं. तसेच काजलच्या कुटुंबीयांनी चौधरी बंधू विरोधात नवलपूर पोलिसस्टेशनला अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे परंतु काजल व्हिडीओत म्हणते माझ्या कुटुंबीयांनी दाखल केलेली तक्रार खोटी आहे.आम्ही लग्न केलं असून आता मी यांच्याच सोबतच राहीन.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!