भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यातून थंडी गायब होणार, आता उन्हाचा कडाका वाढणार

मंडे टू मंडे न्युज नेटवर्क। राज्यभरात गुलाबी थंडीचा आनंद घेतल्यानंतर आता नागरिकांना लवकरच उन्हाचा सामना करावा लागणार आहे. पुढच्या एका आठवड्यात थंडी राज्यातून निरोप घेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या वर्षी ११ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडी असणार आहे. त्यानंतर ती राज्यातून निरोप घेईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. यानंतर उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे.

जळगाव,नंदुरबार, धुळे, जिल्ह्याच्या उत्तरेकडील भागात पुढील तीन दिवस अंशतः ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे. तर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊन उकाडा वाढणार आहे.

आता मात्र उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ होऊ लागली आहे. राज्यातील गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही वाढला आहे, यंदा पूर्ण जानेवारी महिना आणि फेब्रुवारीच्या पहिल्या १-२ आठवड्यातही थंडी कायम आहे. यंदा उत्तर भारतात विक्रमी थंडी राहिली आणि याचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला. यंदा राज्यातही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतरही थंडीने मुक्काम ठोकला.

आता उकाड्यातही वाढ होऊ लागली आहे. राज्यात किमान तापमानाची वाढ आजही कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. कमाल तापमानात सरासरीपेक्षा ३ अंशांनी वाढ झाली आहे. एकंदरीतच आगामी तीन दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होण्यास सुरूवात होणार आहे. यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत थंडी राज्यातून निरोप घेईल आणि उन्हाळ्याला सुरूवात होईल .

महाराष्ट्र राज्यात लागोपाठ येत असलेल्या पश्चिमी चक्रवातांमुळे हवेच्या वरच्या थरांत वाऱ्याचा वेग ताशी २७० ते ३०० किलोमीटर आहे. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. ६ किंवा ७ फेब्रुवारीनंतर थंडीत वाढ होऊन ती ११ फेब्रुवारीपर्यंत राहील, उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळं महाराष्ट्र राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!