भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यासह राज्यात तापमानात घट, ‘या” भागात पडणार कडाक्याची थंडी

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. उत्तर भारतामध्ये सध्या धुकं आणि बर्फवष्टीसोबतच पावसाची शक्यताही निर्माण झालीये. याचं कारण म्हणजेच एकापाठोपाठ येणारे तीन पश्चिमी विक्षोभ हे आहे. याचाच प्रभाव महाराष्ट्रात होणार आहे.

येणाऱ्या काळात राज्यात पुणे, नाशिक, जळगाव जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडू शकते. यासोबतच राज्यातील अनेक भागांमध्ये फेब्रुवारीच्यासुरुवातीला तापमान हे १० डिग्रीच्या खाली जाऊ शकते.मुंबई आणि पुण्यामध्येही सकाळी धुक्यांसोबतच तापमानात घट पाहायला मिळू शकते. विदर्भासोबतच राज्यातील तापमान ४ फेब्रुवारीपर्यंत कमी होणार आहे. विशेषतः विदर्भात जास्त थंडी पडेल. येथे दिवसाचे आणि रात्रीचे तापमान सरासरीत किंवा खाली राहील असा अंदाज आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानात काही प्रमाणात वाढ होत होती. थंड हवेची दिशा बदलल्याने पारा वाढत होता. मात्र आता पुन्हा एकदा थंडी पडणार आहे. आजपासून महाराष्ट्रात किमान तापमाना तीन डिग्रीपर्यंत घट होऊ शकते. हवामान विभागाने फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र गारठणार अशी भविष्यवाणी केली आहे.

हवामान विभागानुसार, सध्या महाराष्ट्रावर कोणतीही सक्रिय हवामान प्रणाली नाही. यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवसांपर्यंत वातावरण स्वच्छ राहील. या दरम्यान राज्यात उत्तरेतील थंड वाऱ्याची चाहूल लागू शकते. यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. या दरम्यान महाराष्ट्रात किमान तापमान दोन ते तीन डिग्री सेल्सियस होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!