भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

राज्यावर पुन्हा अवकाळी पावसाचं संकट? हवामान खात्याकडून अलर्ट

मुंबई, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली, होळीच्या पार्श्वभूमीवर नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. मात्र, आता पुन्हा एकदा राज्यावर अवकाळी पावसाचे संकट असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पुढील ३ दिवसांत राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

राज्यभरात कुठे पाऊस तर कुठे उष्णता आहे. त्यामुळे विचित्र प्रकारचं वातावरण सध्या पहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रोगराई पसरली आहे. तर पिक भुईसपाट झाली आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पावसानं हातातोंडाशी आलेला घास हिसकावला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्चपासून मध्य भारताच्या काही भागात, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांसह आसपासच्या भागात हलका हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर IMD GFS मॉडेल व extended range अंदाज या भागांत आणि पूर्व किनार्‍यावर गडगडाटीसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात १३ ते १५ मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहणार आहे. तर तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांचे काढणीसाठी आलेले रब्बी हंगामातील गहू, हरभरा तसेच फळबाग आणि भाजीपाला पिकं भुईसपाट झाली आहेत. गारपिटीमुळे आणि वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!