स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी? भविष्य आज ठरणार
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत महत्वाचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने 13 तारखेला आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली होती. त्यावर सुनावणीसाठी कोर्टानं 17 मे रोजीची दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित केली आहे. आयोगाकडून महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर आज कळणार आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षा पासून निवडणुका प्रलंबित असून या निवडणुका शहरी आणि ग्रामीण आशा दोन टप्प्यात निवडणुका पार पाडण्याची शक्यता आहे.दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया जाहीर करा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं 4 मे रोजी दिलेल्या निकालात दिले होते. त्यानुसार निवडणुका तातडीनं घेण्याचं बंधन निवडणूक आयोगावर आहे. त्यामुळे निवडणुका पावसाळ्यात होणार का याबद्दलही कुतूहल निर्माण झालं होतं. पण आयोगानं पावसाळ्यात निवडणुका घेण्यात काय काय प्रशासकीय अडचणी आहेत, याचा पाढाच सुप्रीम कोर्टातल्या याचिकेत वाचला होता.
राज्यातील पावसाळ्यानंतर महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात केलेली ही विनंती मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे. तसं झाल्यास गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांत, पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे.
कोर्टानं हे स्पष्ट केल आहे की कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ निवडणूक लांबवता येणार नाही. शिवाय ट्रिपल टेस्ट पूर्ण होईपर्यंत ओबीसी आरक्षण देता येणार नाहीय. त्यामुळे कुठलंही कारण सांगून निवडणुका लांबवू नयेत. आयोगानं निवडणुकांची तयारी तर सुरु केलीय, पण निवडणूक आयोगाच्या या अडचणींचा विचार करुन पावसाळ्यानंतरची मुभा कोर्ट देणार का ? आज निवडणुकांचं भवितव्य ठरणार.