धक्कादायक : कपडे बदलवत असतांना महिलेचे चोरून चित्रीकरण
भुसावल, मंडे टू मंडे न्यूज वृत्तसेवा। शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील एक विवाहिता आंघोळ करून कपडे बदलवत असताना तिचे गुपचूप चित्रीकरण करणाऱ्या प्रतिक जीवन शिंगारे याचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
- दुष्काळाच्या सावटात वाढदिवसाचा जल्लोष नको; आ.चंद्रकांत पाटील यांची संवेदनशील भूमिका, शुभेच्छांसाठी प्रत्यक्ष येऊ नये; कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवावेत !
- ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का? १४ आमदार शिंदेंच्या संपर्कात, दाव्याने खळबळ
- भुसावळच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; ११ नगरसेवक शिंदेसेनेत दाखल
या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,भुसावल शहरातील ओंकारेश्वर मंदिर परिसरातील एक विवाहित महिला आंघोळीनंतर कपडे बदलत असताना तिच्या असे लक्षात आले की,आपलं कोणतरी चित्रीकरण करत आहे तेंव्हा तिला एक व्यक्ती मोबाईल द्वारे आपले चित्रीकरण करत असल्याचे दिसले.
लागलीच सदरचा प्रकार हा तिने तिच्या पतीस सांगितल्याने त्यांना प्रतिक जीवन शिंगारे, वय ३४ हा तेथून पळून जाताना दिसला. या बाबत महिलेने शहर पोलीसस्टेशन ला तक्रार केल्याने प्रतीक जीवन शिंगरे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.




