‘पॉवरफुल’ पवार कोण? काका की पुतण्या? अजित पवार की शरद पवार? आज चित्र स्पष्ट होणार! कार्यकर्ते टेंशनमध्ये
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळाली, आधी शिवसेनेचे दिन गट झाले त्या नंतर राष्ट्रवादीत दोन गट पहायला मिळाले खरी राष्ट्रवादी कोणाची ? कोण पवार ठरणार पॉवरफुल हे आज पहायला मिळणार आहे. आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज दोन्ही गटाच्या मुंबईमध्ये बैठका होणार आहेत. कोणत्या बैठकीला कोण उपस्थित राहाणार हे पहाणं महत्त्वाचं ठारणार आहे. आज दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दोन्ही गाटचे कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहाता यावं यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. ५३ आमदारांपैकी किती आमदार कोणत्या गटाकडे आहेत हे आज स्पष्ट होणार आहे. यानंतरच दोन्ही गटाकडून पुढील रणनिती ठरवली जाणार आहे.
दरम्यान आज मुंबईत होणाऱ्या बैठकीनंतर ६ जुलैला म्हणजे उद्या नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणार आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शरद पवार हे स्वत: असणार आहेत. या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीच्या आधारे पक्षाचा प्रभारी कोण असेल याचा निर्णय होणार आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या बाजूने घेऊन कायदेशीररीत्या आपली बाजू भक्कम करण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आजची ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. या बैठकीमधून दोन्ही गटाकडे असलेल्या संख्याबळाचा आकडा स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी आमदारांना व्हीप जारी केला आहे. उद्याच्या बैठकीसाठी शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाडांनी तर अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी आमदारांना व्हीप जारी केला आहे. त्यामुळे उद्या नेमकं काय होणार?, या चिंतेने आमदारच नव्हे, कार्यकर्तेही टेंशनमध्ये आले आहेत.