भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग ; ओबीसी आरक्षणाचा विचार करता निवडणूका पुढे ढकलणार? मुख्यमंत्र्यांच मोठं विधान

मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली. यानंतर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं. यानिमित्ताने ते मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल बोलणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहेत. या निवडणुकींसाठी १८ ऑगस्टला मतदान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण अनिवार्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

मात्र सत्ता बदलानंतर शिंदे आणि फडणवीसांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणासह घेतल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. आजही पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना याबाबत सवाल विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूका घेणे योग्य होणार नाही. या शिवाय सध्या पाऊस आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाशी चर्चा करून निर्णय घेऊ, असं शिेदेंनी यावेळी सांगितलं. ओबीसी आरक्षणाचा विचार करता निवडणूक पुढे ढकलाव्या यासाठी सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या निवडणुका ६ महिने पुढं ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!