राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडणार? मोठ्या भूकंपाची शक्यता
मुंबई,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। शिवसेनेत सुरु असलेल्या अंतर्गत कलहानंतर एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार असल्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याची माहित सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारमधील पाठिंबा काढला तर ठाकरे सरकार खरंच कोसळू शकतं.
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी पक्षातील चलबिचल या बंडामुळे समोर आली आहे. शिवसेना आमदारांमधील नाराजी जाहीर पत्रातून बाहेर आली असतानाच राष्ट्रवादीमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कम राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं बदलली असल्याची माहिती सूत्रानी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज वाय.बी. चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आता महाविकास आघाडी सरकारमधून पाठिंबा काढणार असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 24 तासांपूर्वी सरकारच्या पाठिशी भक्कमणे राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं जाहीर केली होती. पण, आजच्या बैठकीत आमदारांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पक्षात फुट पडू नये म्हणून राष्ट्रवादीनं भूमिका बदलली असल्याचं मानलं जात आहे.