गुटखा खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी… तुम्ही गुटखा खाताय …मग ही बातमी वाचाच
मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। गुटखा, तम्बाखू हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. सरकार याबाबत प्रत्येक ठिकाणी चेतावणी देते. मात्र, तरीसुद्धा तरुण पीढी गुटखा, तम्बाखू खाऊन आपले आयुष्य बरबाद करत आहे. दरम्यान, आता डुंगरपूर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या एका पथकाने पुन्हा एकदा कर्करोगाची कठीण शस्त्रक्रिया करुन एका रुग्णाला नवजीवन दिले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि कॅन्सरतज्ञ डॉ. महेश पुकार यांनी जवळपास साडेसात तासांच्या कठीण शस्त्रक्रियनेनंतर एका रुग्णावर तोंडाच्या कर्करोगावर उपचार करण्यात आले आहेत. डॉ. पुकर यांच्या नेतृत्त्वात १० डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या पथकाने ही कठीण शस्त्रक्रिया करुन कॅन्सरची गाठ बाहेर काढली आणि त्याजागी कृत्रिम जबडा बसवून प्लास्टिक सर्जरी केली आहे.
दोवडा पंचायत समितीचे सोहनलाल कलाल यांना गुटखा खायची सवय होती. या सवयीमुळे त्यांच्या तोंडात डाव्या बाजूला गालावर फोड आला होता. बराच वेळ झाला तरीही हा फोड सुधरला नाही. यानंतर त्यांनी गुजरातच्या एका रुग्णालयात धाव घेत त्याठिकाणी उपचार केले. याठिकाणी डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्यांना कर्करोग झाल्याचे निदान झाले. यानंतर त्यांच्या परिवाराला संपूर्ण जबडा काढून प्लास्टिक सर्जरी करण्याचा सल्ला देण्यात आला. या सर्जरीमध्ये जवळपास १० लाख रुपये खर्चही सांगण्यात आला होता. यानंतर महागड्या खर्चामुळे गुजरातमध्ये उपचार न करता राजस्थानच्या डुंगरपूर जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले.
यानंतर डॉ.महेश पुकार यांनी रुग्णाची कॅन्सरची बायोप्सी चाचणी केली. यामध्ये कर्करोग असल्याचे निदान झाले. यानंतर डॉक्टरांचे पथक तयार करुन रुग्णांची संपूर्ण तयारी करण्यात आली. त्याअंतर्गत इतर आजार आणि संसर्गाची माहिती घेतल्यानंतर रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली. तब्बल साडेसात तास ही शस्त्रक्रिया चालली. यामध्ये रुग्णाच्या जबड्याला काढण्यात आले. यासोबतच कर्करोगाच्या गाठीलाही काढण्यात आले. याजागी उदयपूर येथील टाइटेनिअमची प्लेट लावून कृत्रिम जबडा बनवण्यात आला.
या शस्त्रक्रियेत ६ ते ७ तासांचा कालावधी लागला. शस्त्रक्रियेमध्ये डॉ. हेमंत बामणिया, डॉ. कमलेश, डॉ. घनश्याम राठौड, डॉ. ममता यांच्यासह नर्सिंग स्टाफच्या टीमने साडेसात तासांची यशस्वी शस्त्रक्रिया केली. तसेच रुग्णाला कोणत्याही प्रकारचा पैसे द्यावे लागले नाही. त्याचा उपचार अगदी निशुल्क स्वरुपात करण्यात आला. मात्र, लोकांनी तंबाखू, गुटखा आणि दारुच्या व्यसनापासून दूर राहावे, असे आवाहन डॉ. पुकार यांनी लोकांना केले आहे.