Russia Ukraine War : युद्ध संपवायचंय …चार अटी मान्य करा …युद्ध संपेल! युक्रेनसमोर रशियाचा प्रस्ताव
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई,मंडे टू मंडे वृत्तसेवा। रशिया आणि युक्रेनमध्ये सलग 13 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्यांना युक्रेनकडूनही जोरदार प्रतिउत्तर दिले जातेय. मात्र रशियाकडून सतत सुरु असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठी हानी झाली आहे. शहरचं शहरं बेचिकार झाली आहेत. युक्रेनमध्ये सुरु असलेले हल्ले थांबवण्यासाठी आता रशियाने चार अटी ठेवल्या आहेत.
दरम्यान कीवने या अटी जर मान्य केल्या तर रशियाकडून लष्करी कारवाई लवकरचं थांबवण्यात येईल असे मॉस्कोने म्हटले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या युद्धाला बारा दिवस उलटून गेले आहेत, मात्र दोन्ही देशांमध्ये अद्याप कोणत्याही ठोस मुद्द्यावर सहमती झालेली नाही. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेची तिसरी फेरी सोमवारी झाली, पण यातूनही काही निष्पन्न झाले नाही.
दरम्यान क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले की, मॉस्कोची मागणी आहे की, युक्रेनने लष्करी कारवाई थांबवावी, घटनेत दुरुस्ती करावी, क्रिमियाला रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्यावी आणि डोनेस्तक आणि लुगांस्क यांना स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे 24 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच रशियाकडून अशाप्रकारचे वक्तव्य करण्यात आले आहेत. रॉयटर्सशी बोलताना पेस्कोव्ह म्हणाले की, युक्रेनला या अटींची जाणीव होती, त्यामुळे हे सर्व काही क्षणात थांबू शकत होते.
क्रेमलिनच्या प्रवक्त्याने यावर जोर दिला की, रशिया युक्रेनवर आणखी कोणतेही प्रादेशिक दावे करत नाही. तसेच कीवची मागणी करत आहेत हे देखील तितकचं खोट आगे. ते म्हणाले की, ‘आम्ही युक्रेनमध्ये डिमिलिटरायझेशन पूर्ण करत आहोत. आम्ही ते पूर्ण करू. पण मुख्य म्हणजे युक्रेनने आपली लष्करी कारवाई थांबवली पाहिजे. त्यांनी त्यांची लष्करी कारवाई थांबवावी पाहिजे त्यांनतर आम्हीही गोळीबार करणार नाही.
रशियाने युक्रेनवर उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडून हल्ले केले आहेत. यामुळे कीव, खारकीव आणि मारियुपोल या शहरांत मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. युरोपने दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठे निर्वासित संकट पाहिले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांनी रशियाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी मॉस्कोवर काही निर्बंध लादले आहेत. युक्रेनमधील 406 नागरिकांच्या मृत्यू
युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार कार्यालयाने म्हटले आहे की, रशियाच्या आक्रमणाच्या सुरुवातीपासून युक्रेनमध्ये 406 नागरिकांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. याशिवाय रविवारी मध्यरात्रीपर्यंत 801 जण जखमी झाल्याचीही पुष्टी झाल्याचे कार्यालयाने सांगितले. विशेषत: सरकार-नियंत्रित भागात मृतांची संख्या तुलनेने जास्त असू शकते.