भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

संजय राऊत ‘व्हिडीओ बॉम्ब’ फोडणार! विरोधी पक्षातले कोणते ‘साडेतीन’ नेते पोलखोल होणार?

मुंबई, मंडे टू मंडे वृत्तसेवा: आज होणाऱ्या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेसंदर्भातील एक मोठी बातमी हाती लागली असून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडीओ पॅटर्न पाहायला मिळणार आहे. व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेत आज कोणता गौप्यस्फोट होणार? संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून फोडल्या जाणाऱ्या राजकीय बॉम्बनं विरोधी पक्षातले कोणते नेते घायाळ होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आणि त्याच पत्रकार परिषदेसंदर्भातील एक मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती लागली आहे. शिवसेना भवनातील तयारी पाहता आजच्या पत्रकार परिषदेत लाव रे तो व्हिडीओ पॅटर्न पाहायला मिळणार आहे. शिवसेना पत्रकार परिषदेत व्हिडीओ दाखवून मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं समजतंय. आता व्हिडीओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.  दरम्यान झुकेंगे नही असा मजकूर असलेले टी-शर्ट देखील शिवसेनेनं कार्यकर्त्यांना वाटले आहेत. 

आम्ही खूप सहन केलं आम्ही, बर्बाद पण आम्हीच करणार आहोत. डोक्यावरुन खूप पाणी गेलंय? आता बघाच, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहे. तिथं संपूर्ण पक्षासह पदाधिकारी, सर्व आमदार, खासदार उपस्थित असतील.  मी आताच बोलणार नाही, उद्या सर्व गोष्टींवर उत्तरं मिळतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 
 
राऊतांनी म्हटलं की, भाजपचे साडे तीन लोकं हे त्याच (अनिल देशमुखांच्या) कोठडीत असतील. महाराष्ट्रात देखील सरकार आहे, शिवसेनेच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यांची झोप उडाली आहे. जे करायचं ते करा आता मी घाबरणार नाही, असं राऊतांनी म्हटलं आहे. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!