शिवसेना ठाकरे गट उमेदवारांची उद्या घोषणा करणार, संभाव्य यादी…
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीला जागावाटपावर ठोस तोडगा काढता आलेला नाही. मविआमध्ये काही जागांवरील वाद अद्याप मिटलेला नाही. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची शिवसेना २६ मार्च रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. तशी माहिती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या या पहिल्या यादीत एकूण १५ ते १६ उमेदवारांचा समावेश असू शकतो. याच उमेदवारांची संभाव्य यादी एबीपी माझाच्या हाती लागली आहे.
शिवसेनेच्या (ठाकरे गट) पहिल्या यादीत कोणत्या मतदारसंघांचा समावेश?
शिवसेना आपल्या पहिल्या पहिल्या यादीत ज्या जागांवर कोणताही वाद नाही, त्या मतदारसंघांवर उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यासह वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेल्या छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण मुंबई, सांगली, मावळ या जागांवरही शिवसेना आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते.
शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संभाव्य उमेदवार
१ . दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
२ . उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर
३ . उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील
४ . दक्षिण मध्य मुंबई- अनिल देसाई
५ . रायगड – आनंद गीते
६ . रत्नागिरी सिंधुदुर्ग- विनायक राऊत
७ . ठाणे- राजन विचारे
८ . धाराशिव- ओमराजे निंबाळकर
९ . परभणी -संजय जाधव
१० . सांगली – चंद्रहार पाटील
११ . मावळ- संजोग वाघेरे
१२ . शिर्डी- भाऊसाहेब वाकचौरे
१३ . बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
१४ . हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
१५ .छत्रपती संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
१६ . यवतमाळ वाशिम संजय देशमुख