भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नगरपालिका निवडणुक : जळगाव जिल्ह्यात २ डिसेंबर “या” मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी

.जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी जिल्ह्यातील जामनेर, अमळनेर, भुसावळ, भडगाव, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, सावदा, फैजपूर, रावेर, यावल, मुक्ताईनगर, वरणगाव, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, शेंदुर्णी, आदी नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक असून लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२५(बी) अन्वये मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.

गेल्या निवडणुकांत काही आस्थापनांनी सुट्टी न दिल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यामुळे यंदा विशेष खबरदारी घेत, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, दुकाने, कारखाने, हॉटेल्स, मॉल्स, आयटी कंपन्या, व्यापारी प्रतिष्ठाने आदींना हे आदेश लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

अपवाद अत्यावश्यक व अविरत सेवांमध्ये सुट्टी देणे शक्य नसल्यास कर्मचारी व कामगारांना २ ते ३ तासांची विशेष सवलत देऊन मतदानाचा हक्क बजावता येईल, याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास आणि त्यामुळे मतदार वंचित राहिल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असे सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!