भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी : शाळांच्या वेळात बदल,सकाळी ९ वाजे नंतर भरणार शाळा

नागपूर,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा, असे राज्यपाल रमेश बैस यांनी अलिकडेच सुचविले होते. राज्यपालांच्या या मताशी सरकार सहमत असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

सकाळच्या सत्रात भरणाऱ्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना लवकर उठावं लागतं, त्यामुळं त्यांची झोप होतं नसल्याने अनेकदा लहान मुलं सकाळी झोपेतून उठण्यासाठी कंटाळा करतात, पालकांनाही मुलांना सकाळी उठविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते त्यामुळे लहान मुलांना शाळेची वेळ दुपारची असावी असं वाटत असते, म्हणून पुढील येणाऱ्या शैक्षणिक वर्षात दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची दुपारच्या सत्रात सकाळी ९ वाजल्या नंतर शाळा भरणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी केली.

सकाळी ९ नंतर शाळा भरविण्या बाबत एकट्याने निर्णय घेणे योग्य नसल्याने तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मध्ये मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समावेश करण्यात आला असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे केसरकर यांनी सांगितले.

तज्ज्ञ समितीचा अहवाल प्राप्त होताचं पुढील शैक्षणिक वर्षापासून सकाळी ९ वाजे नंतर शाळा भरेल, तसेच सर्व माध्यमांच्या आणि सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांना हा नियम लागू असेल, सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सात ऐवजी नऊपर्यंत पुढे ढकलल्यास मुलांची झोप पूर्ण होऊन त्यांना शिक्षणाची गोडी लागेल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!