जामनेर

कंटेनरची पीकअप ला जोरदार धडक, भीषण अपघातात तीन जण जागीच ठार

जामनेर,जि. जळगाव. मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। डाक विभागाच्या कंटेनरने समोरून येणाऱ्या पीकअप ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना जामनेर शहराच्या जवळ घडली.

मिळालेल्या माहिती नुसार, जामनेर शहरा जवळील शेतकरी सहकारी जीनिंग मिलच्या वळणावर काल सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या सुमारास भुसावळ येथून छत्रपती संभाजीनगर कडे जाणार्‍या डाक विभागाच्या कंटेनरने समोरून येणार्‍या पीक अपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.येथील परिसरातील लोकांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठी गर्दी करत तिघांचे मृतदेह बाहेर काढून जामनेर पोलिसांना माहिती कळवली. जामनेर पोलीस पुढील कारवाई करत रात्री उशीरापर्यंत मयत झालेल्या तिघांची ओळख पटवण्याचे काम सुरू होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!