भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

नागपुरात छापल्या जातात शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा; वाचा सत्य

Monday To Monday NewsNetwork।

नागपूर(वृत्तसंस्था)। बनावट नोटा तयार करून चलनात आणणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्या ताब्यातून बनावट नोटा आणि प्रिंटरसह मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. नीलेश राजू कडबे वय २४, रा. मलका कॉलनी, समतानगर आणि माहरूफ खान रफीक खान वय २४, रा. ताजनगर, टेका अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. नीलेश हा मास्टरमाईंड असून, त्याच्यावर यापूर्वीही बरेच गुन्हे दाखल आहेत.

बनावट नोटा टोळीतील मुख्य सूत्रधार नीलेश याची आई सेल्सगर्लचे काम करते. नीलेशचे मूळ घर समतानगर येथे आहे. परंतु, तो घरी राहत नाही. दोन महिन्यांपूर्वी त्याने मानकापूर हद्दीत एकतानगर येथे भाड्याने खोली घेतली होती. आम्ही विद्यार्थी असून अभ्यास करण्यासाठी खोली पाहिजे असे घरमालकाला सांगून खोली बळकावली होती. त्यानंतर तो त्या खोलीत बनावट नोटा तयार करीत होता. ही माहिती खबऱ्याला समजताच त्याने युनिट २ च्या पथकाला माहिती दिली.शनिवारी रात्री पोलिस पथकाने नीलेशच्या घरी छापा घातला. त्यावेळी तो घरातच बनावट नोटा तयार करताना आढळला. त्याच्या ताब्यातून दोन प्रिंटर, शाईचे डबे, कटर, मोजमाप पट्टी, मार्कर पेन, शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा सापडल्या आहेत. काही नोटा अर्धवट प्रिंट केलेल्या मिळाल्यात. अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) सुनील फुलारी, पोलिस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय किशोर पर्वते, सहायक निरीक्षक सुमीत परतेकी, उपनिरीक्षक संदीप काळे, लक्ष्मीछाया तांबुसकर, बलराम झाडोकर यांनी कारवाई केली.

पन्नासच्या नोटांवर भर
दोन हजार किंवा पाचशेची नोट कुणीही तपासूनच व्यवहार करतात. परंतु, पन्नासच्या नोटेला कुणी तपासण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे पकडल्या जाण्याच्या भीतीपोटी ते पाचशेच्या नोटा तयार न करता केवळ शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा तयार करीत होते. या नोटा ते दारूच्या दुकानात, भाजी, फळ विक्रेते यांच्याकडे चालवीत होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!