“राष्ट्रवादीकडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न” : पटोलेंनी हायकमांडकडे केली पवारांची तक्रार
नागपूर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा : गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
- महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना रावेर तालुक्यात जोरदार प्रतिसाद,जावळेंना निवडून आणण्याचा मतदारांचा निर्धार
- रावेर तालुक्यात २२ लाखांचा गुटखा जप्त, गुटखा तस्करांमध्ये खळबळ
- जळगावचे तत्कालीन पोलिस अधीक्षक यांना न्यायालयाचे समन्स
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. पण, राष्ट्रवादीची भूमिका नेहमी भाजपच्या बाजूने असते. राष्ट्रवादीकडून नेहमी सोनिया गांधींचा अपमान केला जातो. ज्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाली त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम राष्ट्रवादी कडून होत आहे, असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. याबाबत काँग्रेस हायकमांड लवकरच योग्य तो निर्णय घेणार आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकला चलो रे वर काँग्रेस ठाम असल्याचं ही नाना पटोलेंनी सांगितलं.
राज्यातील भंडारा आणि गोंदिया या जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा वाद आता टोकाला गेला आहे. नुकत्याच झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीत अध्यक्षपदी काँग्रेसचा तर गोंदियामध्ये भाजपचा विजय झाला आहेत. मात्र यात भंडाऱ्यामध्ये भाजपने काँग्रेसला मदत केली तर गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केली. यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठीत खंजीर खुपसत भाजपला साथ दिली असल्याचा आरोप केला होता. सोबतच याबाबतची तक्रार हायकमांडकडे करणार असल्याचेही पटोले म्हणाले होते.
चिंतन शिबिरात गेल्या अडीच वर्षातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीचे अनेक उदाहरणं आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडली. असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबिर उदयपूरमध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस हायकमांड राहुल गांधी आणि सोनिया गांधींकडे राष्ट्रवादीची तक्रार केली आहे. त्यांनी हे सर्व ऐकून घेतलं या संदर्भात आता पुढची रणनीती ठरवली जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.