भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्र

२४ तासांत महिलेचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह; दुसरा निगेटिव्ह कोरोना चाचण्यात गोडबंगाल, कुटूंबियांचा सवाल!

नाशिक : (निशाद साळवे)। महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या संसर्गामुळे नागरिक बेजार झाले असताना, तपासण्या करणाऱ्या लॅबपासून ते रुग्णालयांच्या चुकांमुळे समस्या अधिकच वाढत असल्याचे दिसून येत आहे, असाच एक प्रकार नाशिक मधील ऐका लॅबच्या चुकीमुळे समोर आला. एका वृद्ध महिलेचा पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह आलेला अहवाल दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आला. हे २ दिवस कोरोना रुग्णांमध्ये दाखल केल्याने त्या रुग्णास कोरोना झाल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल रुग्णाच्या नातेवाइकांकडून केला जात आहे. 

कोरोना संसर्ग वाढीतील पहिल्या दहा हॉटस्पॉट मध्ये समावेश असलेल्या नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग वाढला असून, भीतीमुळे नागरिक रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किंवा आरटीपीसीआर चाचणी करून घेत आहेत. मात्र, लॅबकडून प्राप्त होणाऱ्या अहवालामुळे गोंधळ अधिकच वाढत आहे. याचाच फटका चेतनानगर मधील एका वृद्ध महिलेला बसला, चेतनानगर मधील ७५ वर्षीय वृद्धेला अर्धांगवायूचा झटका आल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला त्या महिलेच्या मुलाला देण्यात आला. शनिवारी (ता. २७) मुलगा त्या महिलेला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी अपोलो रुग्णालयाशी संबंधित सुप्रीम लॅबमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. २८ मार्चला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेला उपचारासाठी कोविड कक्षात दाखल करण्यात आले. लक्षणे नसल्याने महिलेच्या मुलाने त्याच लॅबमध्ये दुसरी चाचणी करण्याचा निर्णय घेतला. तेथे नमुना दिल्यानंतर २९ मार्चला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतरही संबंधित वृद्ध महिलेला २४ तास कोविड कक्षातच ठेवण्यात आले. त्यामुळे महिला कोरोनाबाधित आढळून आल्यास जबाबदारी कोणाची, असा सवाल नातेवाइकांनी केला आहे. 

चौकशीची मागणी
अवघ्या २४ तासांत एकाच रुग्णाचा पहिला पॉझिटिव्ह, तर दुसरा निगेटिव्ह अहवाल येतो, ही बाब प्राणघातक आहे. निगेटिव्ह अहवाल प्राप्त होऊनही कोविड कक्षातच ठेवले जाते या संदर्भात वैद्यकीय विभागाने सखोल चौकशी करावी. 
निगेटिव्ह असताना पॉझिटिव्ह रिपोर्ट कसा दिला जातो,हे कोरोना चाचण्यांचे रॅकेट तर नव्हे ना संदर्भात वैद्यकीय विभागाने याचीही सखोल चौकशी करावी.अशी मागणी बाधित महिलेचा मुलगा हेमंत अहिरे, याने केली आहे.
 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!