भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

पाच हजारांची लाच भोवली : मुख्याध्यापक लाचलुचपतच्या जाळयात !

Monday To Monday NewsNetwork|

नाशिक, मंडे टू मंडे वृत्तसेवा| सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

याबाबतची माहिती अशी, की दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड येथील शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दामू कळसाईत यांनी तक्रारदाराकडे सातव्या वेतन आयोगाचा फरक काढून दिल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून तडजोडीअंती पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक साधना भोये-बेलगावकर यांनी सापळा लावत मुख्यध्यापकास आज मेरी लिंक रोडवरील अंबिका सुपर मार्केटसमोर लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!