क्राईममहाराष्ट्र

त्या तरुणीचा मारेकरी अखेर सापडला; केला धक्कादायक खुलासा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी) : येथील तपोवनातल्या रामटेकडी भागात एका अज्ञात तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली होती अखेर त्या युवतीचा खून झाल्याचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ही नाशिकरोडच्या देवळाली भागात राहणारी असून झैनब जाकीर कुरेशी असं तिचं नाव आहे. ती तीन महिन्याची गरोदर असल्याचे पोस्टमार्टम मध्ये निष्पन्न झाले. दानिश जावेद कुरेशी (२०) हा मृत तरुणीचा नातेवाईक असून झैनब त्याला “तू माझा पती बनून मला दवाखान्यात नेऊन गर्भपात करून दे. नाहीतर मी तुझे नाव घेईल.” अशी धमकी वारंवार देत होती. या गोष्टीला वैतागून आरोपी दानिश कुरेशी याने तिचा खून केल्याची कबुली दानिशने स्वतः दिली. तपोवन मध्ये एक बाबा असून त्याच्याकडच्या औषधाने आणि जडीबुटीने तुझा गर्भपात करून देतो असे सांगून दानिशने झैनबला ५ डिसेंबर २०२० रोजी तपोवनात नेले. तेथे निर्जन स्थळी घेऊन जाऊन तिचा गळा दाबून डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची कबुली सदरील आरोपीने दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!