क्राईमनाशिक

एकनाथ खडसें पाठोपाठ आणखी एका भाजप आमदाराला धमकी

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नुकतीच राज्याचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता त्यांच्या पाठोपाठ भाजपच्या आणखी एका आमदाराला देखील धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे

आमदार एकनाथ खडसेंना धमकीचे प्रकरण ताजे असतानाच नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदेंना धमकी देणारी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. धमकी देणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकारानंतर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून फरांदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात येऊन त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ३ एप्रिल रोजी मध्यरात्री नाशिकच्या उपनगर परिसरात एका विशिष्ट जमावाकडून वाहनांची तोडफोड करत गोंधळ घालण्यात आला होता. या विरोधात आमदार देवयानी फरांदेंनी आवाज उठवला होता. या याप्रकरणी पोलिसांकडून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक शहरातीलच एका २१ वर्षीय युवकाला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या खोलवर जाऊन खऱ्या सुत्रधारांना अटक करावी, अशी मागणी देवयानी फरांदे यांनी केली आहे

या घटनेनंतर देवयानी फरांदे यांनी पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत त्यांनी, ” कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना नाशिकमध्ये घडली. एका धर्माचे लोक रस्त्यावर आले होते. हा पूर्वनियोजित कट होता का? अचानक असे लोक रस्त्यावर कसे आलेत. हिंदू धर्मात भीती निर्माण करणारे काम का करण्यात आले? याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. सर तनसे जुदा करेंगे, आशा घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनेचे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज बघितले का? नाशिक पोलिसांनी यावर काय कारवाई केली? ” असा सवाल देवयानी फरांदे यांनी पोलिसांना केला होता. तसेच या संदर्भात नाशिक पोलिसांना ४८ तासांचा अल्टीमेटम देखील देवयानी फरांदे यांच्याकडून देण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!