क्राईमनाशिक

लग्नाचे आमिष दाखवून सतत साडेतीन वर्ष तरुणीवर अत्याचार

नाशिक,मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। लग्नाचे आमिष दाखवून साडेतीन वर्षांपासून शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नास नकार देणार्‍या तरुणाविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की,रमेश कांतीलाल कामडी ,वय 32, मु. पो. करंजाळी, ता. पेठ, जि. नाशिक ,याने साडेतीन वर्षांपासून पीडित तरुण महिले सोबत ओळख निर्माण करून मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, असे खोटे सांगून लग्नाचे आमिष दाखवत दि. १ जानेवारी २०१९ ते २० मे २०२२ या कालावधीत सिडकोतील घरी पीडित महिलेशी अंगलट करून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

या प्रकारानंतर पीडित महिलेने लग्नाविषयी विचारणा केली असता आरोपी रमेश कामडी याने शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेचे तक्रार दिल्याने रमेश कामडी यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!