ग्रामसेवकासह महिला सरपंच पती एसीबीच्या जाळ्यातया
जळगाव, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। पाचोरा तालुक्यातील वरसाडे येथे रोजगार सेवकाला मानधनापोटी देण्यात येणार्या धनादेशावर स्वाक्षरी करण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारणार्या ग्रामसेवकासह महिला सरपंच पतीला लाचलुचपत विभागाने आज रंगेहात पकडले आहे.
- बनावट शालार्थ आयडी प्रकरणाला नवे वळण ; लॅब असिस्टंट ने केली २३ शिक्षकांची भरती,बनावट कागदपत्रांच्या आधारे वेतन, अजून कोण कोण सामील?
- सात गंभीर गुन्ह्यांतील ‘शोएब बिल्डर’ एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध ; येरवड्यात रवानगी
- फैजपूर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
तक्रारदार हे ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा. अंतर्गत होणाऱ्या रोजगार हमी योजने अंतर्गत कामांसाठी मानधन तत्वावर रोजगार सेवक म्हणून काम करतात. मानधनाच्या धनादेशवर सही करून देण्याच्या मोबदल्यात ६ हजाराची लाच ग्रामसेवक काशिनाथ राजधर सोनवणे(वय-५२) रा.प्लॉट नं.३, शिवनेरी नगर,भडगाव रोड, चाळीसगाव ता.चाळीसगाव जि.जळगांव आणि सरपंच पती शिवदास भुरा राठोड रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा, जि.जळगाव यांनी मागितली मात्र चार हजारावर तडजोड झाल्यानंतर एसीबीकडे मंगळवार, 24 रोजी तक्रार नोंदवण्यात आली. मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत वरसाडे प्र.पा.कार्यालयात सापळा रचण्यात आला. आरोपी राठोड व सोनवणे यांना तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.





