क्राईमनाशिक

चित्रपटगृहात चालू शो मध्ये फटाक्यांची तुफान अतिशबाजी, दर्शकांमध्ये मोठा गोंधळ

मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा। चित्रपटगृहात चित्रपट शो सुरू असताना टवाळखोरांनी हुल्लडबाजी करत फटाक्यांची तुफान अतिशबाजी केली, सुतळी बॉम्ब व इतर फटाके फोडल्याची धक्कादायक घटना मालेगाव शहरा मध्ये घडली, घटनेनं खळबळ उडाली,

या बाबत अधिक माहिती अशी की,मालेगाव शहरातील मोहन टॉकीजमध्ये रात्री ९ ते १२ च्या शो दरम्यान चित्रपगृहात अचानक फटाक्यांची अतिशबाजी सुरू झाल्यानं चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांमध्ये एकच गोंधळ उडाला. चित्रपटगृहात धावपळ उडाल्याचं पाहायला मिळालं. टवाळखोरांकडून हुल्लडबाजी करत फटाक्यांची सुतळी बॉम्ब आणि इतर फटाके फोडून तुफान आतिषबाजी केली, प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर धाव घेतली.

हुल्लडबाजीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चित्रपटगृहात फटाके फोडताना चित्रपटगृहाला आग लागून मोठी दुर्घटना होऊ शकते, अशा घटनांना कधी आळा बसणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!