घरात शौचालय नसल्याने थेट महिलेचे सरपंच पद रद्द– अप्पर जिल्हाधिकार्यांचे आदेश
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मनमाड (प्रतिनिधी): येथून जवळच असलेल्या खादगाव (ता. नांदगाव) येथील सरपंच यांचे घरात शौचालय नसल्याने शौचालयाचा दाखला सादर न केल्याने केल्याने नांदगाव तालुक्यातील खादगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच बनलेल्या संगीता शिवाजी वडक्ते यांचे सरपंच पद रद्द करण्याचे आदेश मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
शौचालयाचा दाखला साद
डिसंबर 2019 मध्ये खादगाव ग्रामपंचायतीची थेट सरपंच पदासाठी निवडणूक झाली होती. प्रथमच नागरीकांमधून सरपंच निवडला जाणार असल्याने मतदारांमध्ये उत्साह पहायला मिळाला होता. त्यावेळी खादगाव ग्रापंचायतीचे थेट सरपंचपद महिला प्रवर्गासाठी राखीव असल्याने संगिता वडक्ते यांच्यासह अन्य दोन महिलांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक अर्ज सादर करतांना शौचालय वापरत असल्याचा ग्रामपंचायतीचा ठराव आणि प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र संगिता वडक्ते यांनी ते स्वत:च्या घरात राहतात. त्यांच्या घरातील शौचालयाचा वापर करतात. असे प्रमाणित करत असलेला ग्रामसभेचा ठराव निवडणूक अर्ज दाखल करते वेळी सादर केला नाही की संबंधित ग्रामपंचायतीचे शौचालयाबाबतचे पत्र देखील दाखल केले नाही, अशा तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या महिलेने केली.
निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी शौचालय वापरत असल्याचे कुठलेही प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासमोर झाली असता. अप्पर जिल्हाधिकार्यांनी संपुर्ण कागदपत्रांची तपासणी करत संगिता वडक्ते यांनी नामनिर्देशन पत्रासोबत शौचालय असल्याबाबतचा ग्रामसभेचा ठराव आणि पंचायतीचे प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1058 च्या कलम 14 (1) व कलम 16 मधील तरतुदीनुसार संगिता शिवाजी वडक्ते यांचे सरपंचपद रद्द करत असल्याचा आदेश दिला.