भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिक

लिफ्ट देणं पडलं महागात ! लिफ्ट देणाऱ्यालाच डोक्यात हातोडा मारुन लुटलं

Monday To Monday NewsNetwork

नाशिक, प्रतिनिधी : नाशिक-पुणे रोडवर शिंदेगाव येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास लिफ्ट देणाऱ्या तरुणाला संशयितांनी मारहाण करत डोक्यात हातोडा मारुन ५० हजारांची रक्कम आणि मोबाईल लुटल्याची घटना घडली असून याप्रकरणी सराईत गुन्हेगार गोल्ड्या आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे, तक्रार मोहम्मद नबीहसन अन्सार (रा. वडाळागाव, मूळ रा. उत्तर प्रदेश) याने दिलेल्या तक्रारीनुसार, ते शिंदेगाव येथे मैत्रिणीसोबत जेवण करण्यास गेले होते. टोलनाक्यावर सराईत गुन्हेगार गोल्ड्या आणि त्याच्या दोन साथीदारांनी लिफ्ट मागितली. गाडी थोडी पुढे गेल्यावर संशयितांनी अन्सार यांना मारहाण व जखमी करत खिशातील सात हजार रुपये आणि मैत्रिणीचा मोबाइल हिसकावून घेतला. गाडीतून वडाळागावात घेऊन जात अन्सार यांचा मित्र अदनान याच्याकडून बळजबरीने ३० हजार रुपये काढून घेतले. संशयित गोल्ड्याच्या विरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यास तडीपार करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!