भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

हुक्का पार्लर व अवैध मद्यविक्री प्रकरणी पोलिसांचा छापा !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील चांदशी परिसरातील सेक हॉटेल मध्ये बेकायदेशीररित्या हुक्का पार्लर व मद्यविक्री प्रकरणी पोलिसांनी छापा टाकत कारवाई करण्यात आली असून २८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुका पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, चांदशी, दरी व मातोरी परिसरात असलेल्या हॉटेल्समध्ये हुक्का व अवैध मद्यविक्री केली जात असल्याचे गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती तसेच या संदर्भात स्थानिक नागरिकांकडून देखील पोलीस अधीक्षक पाटील यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, विशेष पथकाने मंगळवारी रोजी रात्री चांदशी परिसरातील सेक हॉटेलवर छापा टाकला असता यादरम्यान, एका खोलीत ग्राहक हुक्का पितांना आढळून आले. हॉटेलमध्ये २३ ग्राहक, हॉटेल मालक शिवराज वावरे, व्यवस्थापक सचिन सांगळे, ३ वेटर यांना ताब्यात घेऊन, यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर तंबाखूजन्य पदार्थ हस्तगत करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!