भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रशैक्षणिक

सीबीएसईच्या धर्तीवर पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार : वर्षा गायकवाड

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

नाशिक,मंडे टू मंडे वृत्तसेवा। राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या (CBSE) धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. वर्षा गायकवाड यांनी महापुरुषांच्या नावांवरुन करण्यात येणाऱ्या वादावर देखील भाष्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून बाद निर्माण केला जातो, त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या. दुसरीकडे ग्लोबल पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्यासाठी आवश्यक असणारी रजा मंजूर करण्याचे आदेश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पहिली दुसरीच्या अभ्यासक्रमातील बदलानंतर नवा अभ्यासक्रम कसा असेल हे पाहावं लागणार आहे.

पहिली दुसरीचा अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर असणार
वर्षा गायकवाड यांनी येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार असून तो आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपी च्या शाळांमधून शिक्षण देणार आहे, अशी माहिती दिली.

महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करुन देणार
नेताजी सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यां नावाववरून वाद निर्माण केला जातो. त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा,छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!