भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्ह्यात दोन एसटी बसेसवर दगडफेक ,चालक जखमी

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव,मंडे टू मंडे वृत्तसेवा। जळगाव जिल्ह्यात आज एकाच ठिकाणी दोन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. यात बसचा समोरील काच फुटून चालक गंभीर जखमी आहे. तर दुसऱ्याही बसचा समोरील काच फुटून प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला, यासंदर्भात संशयित मोटर सायकल स्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

अधिक माहिती अशी की, बस क्रमांक (एमएच 20 BL 4097) ही जळगाव ते धुळे या मार्गावर विचखेडा या गावाजवळ धावत असताना मोटर सायकल क्रमांक 0785 वरील दोन व्यक्तींपैकी मागे बसलेल्या व्यक्तीने सदर बसवर दगडफेक फेकून मारला. या दगडफेकीत बसचा समोरील काच फुटून चालक संजय गोविंद रंधे यांना दुखापत झालेली आहे.

तसेच काही वेळातच याच ठिकाणी जळगाव आगाराची दुसरी बस क्रमांक एम एच 20 3381 ह्या धुळे येथून जळगाव जाणाऱ्या बसवर दुपारी 12:45 च्या सुमारास याच मोटर सायकल स्वार व्यक्तींनी दगडफेक केली. या दगडफेकीत बसचा काच फुटला आहे. बस चालक सोपान सपकाळे (क्रमांक 1358) यांनी प्रसंगावधान राखून बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.या बाबत संशयित मोटर सायकल स्वार विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!