भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमनाशिकमहाराष्ट्रशैक्षणिक

बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेची आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई

नाशिक, मंडे टु मंडे न्युज | बोगस शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मालेगाव येथील गाजत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि कार्यालयीन अधीक्षकासह प्रमुख अधिकाऱ्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईमुळे नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

मंगळवार दि.९ रोजी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. मध्यरात्री जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी आणि एका कार्यालयीन अधीक्षकाला त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या अधिकाऱ्यांवर बोगस शिक्षक भरती प्रकरणात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळ्यातील धागेदोरे थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, याचा अंदाज येत आहे.

या प्रकरणात या पूर्वी एका खासगी शिक्षण संस्थेच्या चालकासह तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे समजते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे या घोटाळ्यात आणखी कोण-कोण सामील आहे, हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या अधिकाऱ्यांची कसून चौकशी केली जात असून, यातून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारवाईने शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. आणखीही काहीं मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!