भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

नाशिकच्या महाकुंभाची सुरुवात कुंभारखेडातून ; ॲड.बोधले महाराज

कुंभारखेडा. ता.रावेर. प्रा. योगेश कोष्टी मंडे टू मंडे न्यूज | वास्तवता आणि समजावणे यात फार मोठा फरक असून याचा मतितार्थ जो समजला तोच आयुष्यात यशस्वी व्यक्ती असे प्रतिपादन फिरत्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह ॲड. जयवंतजी महाराज बोधले पंढरपूर यांनी प्रतिपादित केले.
गुरु शिवाय ज्ञान नाही, गुरुचा पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही हे त्यांनी आपल्या कीर्तनातून स्पष्ट केले.

गेल्या चार दिवसापासून कुंभारखेडा नगरीत चालू असलेल्या ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाच्या निमित्ताने आज महाराजांची सेवा होती. आज महाराष्ट्र राज्याचे मंत्री ना. गिरीशजी महाजन, मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परिषद माजी  उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, खंडोबा देवस्थानाचे गादीपती पवन महाराज हे उपस्थित होते. गुरुशिवाय जीवनात काहीच शक्य नाही असं सांगून महाराजांनी गुरूंचे महत्त्व विशद केले, कितीही अवघड प्रसंग जीवनात आला तरी गुरु हेच एकमेव आहे की ते कितीही संकटात आलेल्या आपल्या शिष्याला कुठलीही इजा होऊ न देता सहिसलामत बाहेर काढतात हे विविध उदाहरणाचे दाखले देऊन स्पष्ट केले.

सप्ताहाच्या निमित्ताने परिसरातील नव्हे तर संपूर्ण जिल्हाभरात मोठ्या संख्येने भावीक मुक्कामास आहे. आलेल्या सर्व भाविकांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था परिसरातील भक्तांकडून योग्य प्रकारे केले जातात.
सप्ताहात मार्गदर्शक म्हणून परमपूज्य जनार्दन जी महाराज मुक्ताई संस्थानाचे हरणे बाबा फैजपूर चे श्री नरेंद्र नारखेडे, मुक्ताईनगर चे रवींद्र भैया पाटील तसेच परिसरातील सर्व भक्तजन सहकार्य करत असून परिसराला महाकुंभाचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!