भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

नशिराबाद नगर परिषद करणार स्ट्रीट लाईट साठी हायड्रॉलिक क्रेन चा वापर

नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज डॉ. दीपक लोखंडे | नशिराबाद नगर परिषद तर्फे शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्ती कामांमध्ये गती आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. वेळेची बचत करून नागरिकांना तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरात प्रथमच हायड्रोलिक क्रेनचा वापर करण्यात येत आहे.


उंच ठिकाणांवरील स्ट्रीट लाईट दुरुस्तीची कामे पारंपरिक पद्धतीने करताना वेळखाऊ व धोकादायक ठरत होती. मात्र हायड्रोलिक क्रेनच्या साहाय्याने ही कामे अधिक सुरक्षित, जलद आणि कार्यक्षम पद्धतीने पूर्ण होणार आहेत. सध्या नगर परिषदेकडे स्वतःची हायड्रोलिक क्रेन उपलब्ध नसली तरी भाडेतत्त्वावर क्रेन मागवून कामास सुरुवात करण्यात आली आहे.


या उपक्रमासाठी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष . योगेश पाटील (पिंटू शेठ), उपाध्यक्ष  पंकज महाजन,  सभापती  चेतन बऱ्हाटे तसेच सर्व सभापती व नगरसेवक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. नशिराबाद नगर परिषदेच्या नव्या कार्यपद्धतीची ही एक झलक मानली जात असून, शहरातील मूलभूत सुविधांच्या उन्नतीसाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होत आहे. नागरिकांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!