नशिराबाद येथे नॅशनल इंग्लिश स्कूलचा भव्य फूड फेस्टिवल उत्साहात संपन्न
नशिराबाद, मंडे टु मंडे न्युज. डॉ.दीपक लोखंडे | पी. जी. कुमावत प्रतिष्ठान, नशिराबाद संचलित नॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये एक दिवसाचा फूड फेस्टिवल उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, व्यवसाय कौशल्य आणि पैशाच्या देवाण-घेवाणीद्वारे गणित विषय अधिक सुलभपणे समजावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचे श्रेय शाळेच्या प्राचार्या सौ. संगीता शाम कुमावत यांच्यासह सुवर्णा प्रताप कुमावत, धनश्री दीपक लोखंडे, निकिता जाधव, दीपाली राहुल पाटील, कोमल पाटील, अश्विनी माळी आणि मोनाली पाटील यांना जाते.
शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे एकूण ३५ स्टॉल्स उभारले होते. राजस्थानची दाल-बाटी हा पदार्थ विशेष आकर्षण ठरला. याशिवाय इडली-सांबार, गुलाब जामून, पाणीपुरी, वडा-पाव, थंडगार मठ्ठा, चना मसाला, सोयाबीन वडी, ढोकळा, ब्रेड सँडविच, मंचुरियन, आईस्क्रीम, मोमोज, भेळ, केळीचे चिप्स आदी विविध पदार्थ अल्प दरात उपलब्ध होते.
या फूड फेस्टिवलचा आस्वाद घेण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. श्याम कुमावत, सचिव श्री. प्रताप कुमावत, पत्रकार डॉ. दीपक लोखंडे, संपादक चंदन पाटील, शैलेश गजऋषी, राहुल पाटील, विक्की बोढरे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली.
हा फूड फेस्टिवलचे हे दुसरे वर्ष होते. पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता पुढील वर्षी याहून अधिक मोठा व दर्जेदार फूड फेस्टिवल आयोजित करण्यात येईल, असे संस्थेचे सचिव प्रताप कुमावत यांनी सांगितले. उपस्थित मान्यवरांनी मुलांचे भरभरून कौतुक केले व या प्रकारचे कार्यक्रम हे प्रेरणादायी ठरतील अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून समारोप करण्यात आला.


