तब्बल ७ तासांनी पुन्हा सुरू झाले Whatsapp, Facebook आणि Instagram
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई, प्रतिनिधी : जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सेवा जगभरात अनेक तास बंद होत्या. मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचं सर्व्हर डाऊन झाल्याने सोशल विश्व ठप्प तब्बल ६ ते ७ तास बंद झाले होते. युजर्सना मेसेज पाठवण्यास अडचणी येत होत्या. सोमवारी रात्री साधारण ९ वाजल्यापासून जगभरात Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुक हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस डाऊन झाले. त्यामुळे नेटकऱ्यांना इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करता येत नव्हती. मंगळवारी पहाटेपासून यातील एक एक प्लॅटफॉर्म पुन्हा सुरळित काम करू लागले आहे.
फेसबुकनं ट्विट करत म्हटलं, की जगभरातील लोक, व्यवसायिक आणि मोठा समुदाय जो आमच्यावर अवलंबून आहे, त्यांची माफी मागतो. आम्ही आमचे अॅप्स आणि सेवा पुन्हा सुरळित करण्यासाठी मेहनत घेत आहोत. आता हे सांगताना आनंद होत आहे, की या सेवा पुन्हा सुरळित सुरू झाल्या आहेत. आमच्यासोबत काम करण्यासाठी धन्यवाद.
सर्व्हर बंद पडल्यामुळे सगळ्या सुविधा बंद झाल्या. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ही सर्व फिचर्स सध्या बंद पडली होती. अखेर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तांत्रिक बिघाड दूर होऊन Whatsapp, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची सेवा पूर्ववत झाली. त्यामुळे जगभरातील नेटकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. अनेक कंपन्या आणि संस्थांसाठी त्यांच्या उत्पादनांची जाहिरात आणि प्रसार करण्यासाठी इन्स्टाग्राम आणि फेसबुक या व्यासपीठांचा वापर केला जातो. परंतु, तब्बल ६ ते ७ तास ही तिन्ही व्यासपीठं ठप्प असल्याने अनेकांना त्याचा फटका बसला होता. हे ३ प्लॅटफॉर्म तब्बल ६ तास डाउन राहिल्यानं जगभरातील वापरकर्त्यांना याचा फटका बसला. डाउन राहिल्यानं फेसबुकच्या शेअरमध्ये तब्बल ५ टक्क्यांची घसरण झाली. मात्र, इतके तास व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाउन का होतं, हे अद्याप समजलेलं नाही.